वाशिम-बाजारपेठेचे ठिकाण
वाशिम हे महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे.वाशिम ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. वाशिम हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ अमरावती मधील विभागातील एक जिल्हा आहे.वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या 2011साली झालेल्या जनगणनेच्या अनुसार लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचा प्रशासकीय व मुख्य कारभार हा वाशिम शहरातून चालतो .
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधव मुख्यतः सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस, ऊस, हळद ही पिके घेतात. जिल्ह्याच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती,पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. याशिवाय अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. तसेच अनेक पर्यटक स्थळ येथे आहेत ज्यामुळे तेथील व्यवसायाला ही गती मिळते जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाची स्थळे म्हणजेच बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर देखील प्रसिद्ध आहेत. कारंजा–वाशिम मधील कारंजा या ठिकाणी नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान आहे तसेच कारंजा या ठिकाणावरील येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे. तर्हाळा मधील तर्हाळा हे ठिकाण हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
रिसोड मधील रिसोड या ठिकाणी अमरदासबाबांचे मंदिर आहे. या पर्यटक स्थळांमुळे इथे पर्यटकांची गर्दी असते ज्यामुळे तेथील स्थानिक व्यवसायाला चालना मिळते.