मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी सरकारचा ११ वर्षांचा अमृतकाळ

भविष्याचा अचूक वेध घेऊन भारताचे कणखर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने नुकतीच गौरवशाली ११ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या अकरा वर्षांच्या काळात भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसाय, राष्ट्रसंरक्षण, भारतीयांचे जनजीवन, धर्म जागरण, संस्कृती रक्षण अशा विविध पातळ्यांवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने घेतलेल्या कठोर निर्णयांची ठळक छाप दिसून […]
सर्वसामान्य जनतेच्या हिताचा, देशाला प्रगतिपथाकडे नेणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2025

भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मलाजी सीतारामन यांनी गेल्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. भारतातील सर्व समाजघटकांना विकासाची संधी देणारा, देशाला प्रगतिपथाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा यात दूरदृष्टीने विचार केला आहे. समाजातील प्रमुख घटक शेतकरी, महिला, गरीब जनता आणि युवकांच्या आशा पल्लवित करणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय […]
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जानेवारीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम

विद्यार्थी जीवनात परीक्षा हा अत्यंत महत्वाचा टप्पा प्रत्येकाला यशस्वीरीत्या पार करावाच लागतो. त्याचे कारण असे की, त्यावरच पुढच्या उज्ज्वल करिअरचे मार्ग दडलेले असतात. परीक्षेत उत्तुंग यश मिळाले, तरच आपल्याला हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येतो. त्यामुळे परीक्षा, अभ्यास आणि परीक्षेची तयारी याबाबत मुलांमध्ये भीतीचे, दडपणाचे वातावरण असते. परीक्षेचा पहिला आणि महत्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे […]
ग्रामीण विकासाला चालना देणारी स्वामित्व योजना

ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आणि जनतेचे जीवनमान उंचाविण्याच्या उद्देशाने नवी स्वामित्व योजना खूपच लाभदायक ठरणार आहे. भारतातील ग्रामीण भागाच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. या योजनेअंतर्गत जमिनीची मोजणी अत्याधुनिक साधनांद्वारे करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा मूळ जमीनधारकांना होणार आहे. भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळवून देणे हा स्वामित्व […]
नव्या महायुती सरकारचे महत्वपूर्ण निर्णय । विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२४ ।

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालेल्या गतिमान महायुती सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर असा या अधिवेशनाचा कालावधी राहिला. हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक घटना-घडामोडी घडल्या. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होऊन ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा […]
‘एक देश, एक निवडणूक’ देशाला मजबूत करणारा कायदा !

एक देश, एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची प्रक्रिया. यामुळे संपूर्ण देशात एकाच वेळेस मतदान होईल, ज्यामुळे वेळ आणि साधनसंपत्तीची बचत होईल. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नुकतेच संसदेत ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयक संसदेत मांडले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसह “एक देश, एक निवडणूक” विधेयक सादर करण्यामागे अनेक उद्दिष्टे […]
गतिमान विकासरथ आता आणखी वेगात ! महाराष्ट्र विकासाची सूत्रे मा. देवभाऊंकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज दुपारी नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाचा आज मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व अन्य मंत्रिमहोदयांचे हार्दिक अभिनंदन ! महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज पद गोपनीयतेची शपथ ग्रहण करतील. महाराष्ट्राचे […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा महायुतीचा महाविजय

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने महाराष्ट्राच्या रणमैदानावर मोठा दिग्विजय मिळवून विरोधी महाविकास आघाडीचे पानिपत केले आहे. महाराष्ट्रातील समस्त जनतेने महायुतीला दिलेला हा महाआशीर्वाद म्हणावा लागतो. आताच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. त्यात भाजपाने अब की बार चारसौ पार असा नारा दिला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अब की बार […]
राज्याला प्रगतिपथावर नेणारे गतिमान महायुती शासनाचे निर्णय

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्य निरंतर प्रगतिपथावर आहे. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यात प्रत्येक समाजघटकाचा बारकाईने विचार […]
कामगारांचे जीवनमान उंचाविणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना-२०२४

लघुउद्योग-व्यवसायात काम करणारा कामगार हा खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या कुटुंबाला आधार देऊन, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या या कामगारांच्या जीवनात आनंदाची पेरणी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्याला अत्याधुनिक प्रशिक्षण आणि तंत्रांच्या साह्याने प्रावीण्याची जोड मिळायला हवी. त्या त्या उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधने यांच्याशी त्यांचा परिचय झाला तर त्यांच्या कार्यकुशलतेत नक्कीच भर पडेल. या माध्यमातून त्यांना […]