महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमित काळानुरूप अनेक नेतृत्व उदयास आली. या नेतृत्वांनी आपल्या इच्छाशक्ती व व्यापक दूरदृष्टीतून समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. आजही राष्ट्र व समाजसेवेत योगदान देण्यासाठी असंख्य क्षेत्रे खुली आहेत. या क्षेत्रांमध्ये असंख्य जनमाणूस समर्पित भावनेने कार्यरतही आहेत. राजकीय क्षेत्राच्या पटलावरही विविध राजकारण धुरंधर आहेत, ज्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली. या असामान्य नेतृत्वांमध्ये अगदी प्राधान्याने घेतले जाणारे नाव म्हणजे विदर्भाचे सुपुत्र श्री. राजू पाटील राजे.