Raju Ptil Raje

राजू पाटील राजे

       महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमित काळानुरूप अनेक नेतृत्व उदयास आली. या नेतृत्वांनी आपल्या इच्छाशक्ती व व्यापक दूरदृष्टीतून समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. आजही राष्ट्र व समाजसेवेत योगदान देण्यासाठी असंख्य क्षेत्रे खुली आहेत. या क्षेत्रांमध्ये असंख्य जनमाणूस समर्पित भावनेने कार्यरतही आहेत. राजकीय क्षेत्राच्या पटलावरही विविध राजकारण धुरंधर आहेत, ज्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली. या असामान्य नेतृत्वांमध्ये अगदी प्राधान्याने घेतले जाणारे नाव म्हणजे विदर्भाचे सुपुत्र  श्री. राजू पाटील राजे !

Raju Ptil Raje

राजु पाटील राजे

जनसामान्यांच्या मनातील नेता

     राजकारणाचा कोणताही वसा-वारसा पाठीशी नसतांना स्वकर्तृत्वावर श्री. राजू पाटील राजे यांनी लोकमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘आपला हक्काचा माणूस’ अशी त्यांची प्रतिमा आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वलाना हे श्री. राजू पाटील राजे यांचं मूळ गाव. सामान्य कुटुंबातून आलेल्या दादांना समाजसेवेचं बाळकडू घरातूनच मिळालं. त्यांचे वडील श्री. उद्धवराव पाटील रेल्वे खात्यात होते. बापू या नावाने त्यांना ओळखले जात असे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. त्यामुळे दादांना बालपणापासूनच समाजकार्याची आवड आहे.

washim mla name

युवकांचे प्रेरणास्थान

   राजकारणात संयमी आणि तेवढेच आक्रमक असलेले दादा उच्चशिक्षित आहेत. दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि अमोघ वक्तृत्वशैलीचा प्रभाव श्री. राजू पाटील राजे यांच्यावर झाला. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे जहाल विचार आणि शिवसेनेची रोखठोक कार्यपद्धती त्यांना आवडली. दादांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात झाली महाविद्यालयीन जीवनापासून. याच वयात त्यांनी श्री. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन भारतीय विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. पुढील काळात पूरक वातावरण मिळत गेलं आणि श्री. राजू पाटील राजे यांचं समाजकार्य आणखी बहरत गेलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्वशैली बहरत गेली. त्यामुळेच युवकांचे, विद्यार्थी वर्गाचे प्रश्न, त्यांच्या समस्या दादांना जवळच्या वाटतात. विदर्भातील युवावर्गाशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.

राजकारणातील समाजकारणी

    विदर्भ क्षेत्रातील युवा नेतृत्व श्री. राजू पाटील राजे यांनी मार्च २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली काही जिल्हा परिषद सदस्य आणि हजारो तरुणांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या प्रभावी समाजकार्याची छाप सोडून त्यांनी प्रदीर्घ काळ आपली कारकीर्द गाजवली. या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पद बहाल केले. या काळात त्यांनी शेतकरी, बेरोजगार युवक, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना मोठा आधार दिला. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य या म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं नेतृत्व

     समाजाच्या सर्वच स्तरात विकास कार्याद्वारे श्री. राजू पाटील राजे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. विदर्भाच्या सर्वसमावेशक विकासाचा विचार त्यांच्या मनात असतो. दिवस-रात्रीची तमा न बाळगता त्यांनी स्वतःला जनसामान्यांच्या कल्याणार्थ वाहून घेतले आहे. गोरगरीब जनतेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. युवकांच्या समस्या, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. समाजातील लोकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. युवक, शेतकरी, महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर पोहचविल्या. वलाना ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे पोलिस कर्मचारी आणि इतरांसाठी जेवण, दवाखान्याचा खर्च तसेच विम्याची व्यवस्था केली. विदर्भात उन्हाळ्यामध्ये पाणीप्रश्नाचा मुकाबला करणाऱ्या जनतेला दादांनी स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा केला. त्याचबरोबर गरजू शेतकऱ्यांना चाऱ्याचे वाटपही केले.

सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन देणारे कलाप्रेमी

     आजघडीला विदर्भातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात, तसेच लोकोपयोगी उपक्रमांमध्ये श्री. राजू पाटील राजे आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत कलावंत, खेळाडूंना सन्मानित करणाऱ्या CM चषक स्पर्धांनी एक काळ मोठा गाजवला होता. हजारो युवा कलावंत, खेळाडूंनी यात सहभाग घेतला. या स्पर्धांचे आयोजन, संयोजन आणि संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून दादांनी एकहाती सांभाळली होती.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

  आपल्या जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही महत्वपूर्ण कार्य केले आहे. समाजातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन दादांनी त्यांचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या काळातही दादांनी उल्लेखनीय कार्य केले. विविध विकास प्रश्नांवर त्यांनी आजवर अनेक आंदोलने उभारून, सर्वसामान्यांचे प्रश्न धसास लावले आहेत.

भाजपातील वजनदार व्यक्तिमत्व

    समाज विकासासाठी, वाशिमकरांसाठी अविरत कार्यमग्न असलेल्या दादांचे व्यक्तिमत्व अतिशय रोखठोक व अभ्यासू असेच आहे. भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्यातील दिग्गज नेतृत्वांचा विश्वास श्री. राजू पाटील राजे यांनी संपादन केला आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून, पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्या स्पष्ट स्वभावशैलीतून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितजी शाह, मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. श्री. चंद्रशेखरची बावनकुळे अशा मातब्बर नेतेमंडळींचं श्री. राजू पाटील राजे यांना खंबीर पाठबळ लाभले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनातून प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. राजू पाटील राजे अखंडितपणे वाशिम जिल्ह्याच्या विकासकार्यात अग्रेसर आहेत.

प्रतिभावंत उद्योजक

      युवकांना नेहमी उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणारे श्री. राजू पाटील राजे स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. आज प्रगतीच्या यशोशिखरावर असलेल्या वलाना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे ते व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. कुशल व सटीक व्यवस्थापनासह दूरदर्शी विचारशक्ती हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपल्या उद्योगांतून जास्तीत-जास्त रोजगार निर्माण व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही असतात.