वाशिम – ऐतिहासिक शहर

प्राचीन काळी वाशीम हे ठिकाण ‘वत्सलगुम’ या नावाने ओळखले जात असे. महाभारत, वात्सायनाचे कामसूत्र, सुमारे दोन हजार वर्षापूर्वी या प्रदेशावर वाकाटकांनी राज्य केले होते. वाकाटक घराण्याच्या एका शाखेची वत्सलगुम ही त्यांची राजधानी होती. वाशीमवर वाकाटकानंतर राष्टकूट, यादव, मोघल व निझामाची सत्ता होतील निझामाच्या काळात वाशिम येथे टाकसाळ होती. इंग्रजांच्या काळात सन १९०२ पर्यंत वाशीम जिल्ह्याचे मुख्यालय होते. १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून ‘वाशीम’ला जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात वाशिम शहर प्रख्यात आहे. या शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म असे होते. ही वाकाटक राजाची राजधानी होती. आजघडीला शेती आणि उद्योग क्षेत्रात वाशिमने मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्याला जोडण्यात आला. पण त्यानंतर २६ जानेवारी १९९८ रोजी वाशिम जिल्हानिर्मिती झाली. वाशिम जिल्ह्यात मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे सहा तालुके येतात. येथील बालाजी मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. जुन्या काळात वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती. अलीकडच्या काळात पुन्हा वाशिमचे महत्त्व वाढू लागले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कष्टातून येथील शेती व्यवसाय वेग घेत आहे. भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर  वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा असून पश्चिमेला बुलढाणा जिल्हा असून उत्तरेस अकोला व अमरावती आणि दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली हे जिल्हे आहेत. वाशीम मधील प्रमुख पिके पहिले तर कापूस व ज्वारी हे वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागात संत्री, ऊस व विड्याच्या पानांचे पीकसुध्दा घेतले जाते. ज्वारी व कापूस जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. सोबत जर नद्या व धरणे आपण जाणून घेतले तर वाशीम जिल्ह्यातील पैनगंगा ही मुख्य नदी असून याशिवाय कास, चंद्रभागा, अरुणावती, अडाण, पूस, काटेपूर्णा व बेंबळा इत्यादी नद्या वाशीम जिल्ह्यातून वाहतात. कारण तालुक्यातील अडाण नदीवरील अडाण प्रकल्प’ हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. उद्योग व व्यवसायात वाशीम जिल्ह्यात कापसावर आधानि उद्योग धंद्याचे प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यात हातमागावा कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला जातो.

वाशीम जिल्ह्याची वैशिष्ट्ये: 

  • पोहरा देवीचे जगदंबा मंदिराचा ‘बंजारा समाजाची काशी’ म्हणून उल्लेख होतो.
  • जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गाव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबर प्रेक्षणीय पर्यटनस्थळ आहे.
  • ‘मंगरूळपीर’ हे तालुक्याचे ठिकाण असून येथील बिरबलनाथाची यात्रा प्रसिद्ध आहे.
  • ‘डव्हा’ हे ठिकाण मालेगाव तालुक्यात असून येथील नाथ महाराजांचे व ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
  • वाशीम जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहराला जैनांची काशी असे म्हणतात. अश्या प्रकारे वाशीम सर्वांगीण रित्या संपन्न संस्कृती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]