नमो ॲप`द्वारे तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न पोहचवा केंद्र सरकारपर्यंत !
सरकारी कामकाज व्यवस्थेत शासन आणि जनता यामधील अंतर प्रचंड आहे. त्यामुळेच सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचत नाहीत. सामान्य जनतेच्या भावना, त्यांचे प्रश्न शासनापर्यंत लवकर पोहचत नाहीत आणि शासनाची सर्व कामेही जनतेला कळत नाहीत. यावरच सोपा उपाय काढत केंद्र सरकार आणि जनतेमधील अंतर भरून काढण्यासाठी देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी नमो ॲप सुरू केले आहे. नमो ॲपद्वारे जनता आपले म्हणणे थेट सरकार दरबारी मांडू शकते. याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संदेश आणि ई-मेल प्राप्त करण्याची संधी प्रदान करते आणि जनतेला या ॲपवरच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील दिली जातात.
* लाखो भारतीयांची पसंती
नमो ॲप हे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचे ऑफिशियल ॲप आहे. मोबाईल फोनच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर या ॲपला ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दिले आहे. लाखो लोकांनी नमो ॲप आपल्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड केले आहे. पंतप्रधान मोदी हे या ॲपद्वारे तरुण उद्योजक, महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधतात. या ॲपवर सामान्य जनता आपले विचार, संकल्पना आणि सूचना शासनापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज पोहचवू शकते. तसेच सरकारच्या विविध कामांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपण आपले योगदान नोंदवू शकतो.
* मिशन ‘नमो अगेन’
नमो ॲपच्या माध्यमातून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या ब्रॅण्डच्या वस्तूंची विक्रीही नमो ॲपच्या माध्यमातून केली जाते. मागील तीन महिन्यात या ॲपच्या माध्यमातून तब्बल पाच कोटी रुपयांच्या वस्तूंची खरेदी भारतीय नागरिकांनी केली आहे. या वस्तूंवर ‘नमो अगेन’ म्हणजेच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या घोषवाक्याचा उल्लेख आहे. या ॲपमार्फत वस्तूंची झालेली प्रचंड विक्री भारतीय जनता पक्षाचा उत्साह द्विगुणित करणारी आहे.
* सरकारी कामकाजाची माहिती
केंद्र सरकारचे हे ॲप सामान्य जनतेसाठी खूपच उपयोगाचे आहे. नमो ॲपवरून पंतप्रधानांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ देखील आपल्याला ऐकता येतो. शासनाच्या कामकाजाची माहितीही या ॲपवर जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे शासनाने केलेला विविध क्षेत्रातील विकास आणि शासनाच्या जनहितासाठी असणाऱ्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतील. इन्फोग्राफिक्सच्या मदतीने ‘गुड गव्हर्नन्स’मुळे कशाप्रकारे जनतेचे जीवनमान सुधारले जाऊ शकते याची प्रचिती नमो ॲपमुळे येते.
* शोधा तुमचा फोटो !
देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण देशभरच नाही, तर जगातही पसरली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींसोबत विविध कार्यक्रमात लोक फोटो घेत असतात. नमो ॲपद्वारे तुम्हाला एक छानशी संधी मिळते. जर आपणही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढलेला असेल आणि तो फोटो डिलीट झाला किंवा हरवला असेल तर या ॲपवर त्याचीही सोय करून दिलेली आहे. या ॲपवर ‘फोटो बूथ’ म्हणून एक फिचर उपलब्ध करून दिले आहे. या फिचरच्या मदतीने तुमचा फोटो शोधता येतो, तसेच तो आपल्या फोनमध्ये डाउनलोडही करता येतो.
* तुमचे प्रश्न पोहचवा सरकारला !
इतर ॲपप्रमाणे हे ॲप वापरण्यासाठी तुम्हाला कोणतीही ॲप परमिशन बंधनकारक नाही. तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी न वापरताही एक गेस्ट म्हणून तुम्ही हे ॲप वापरू शकता आणि शासनापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि प्रश्न पोहचवू शकता. यातील VOIP (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) च्या माध्यमातून या ॲपबद्दलचे प्रसारण केले जाते. थोडक्यात काय, तर देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे नमो ॲप हे केंद्र सरकार आणि सामान्य भारतीय जनता यांच्यातील महत्वपूर्ण दुवा आणि संवादाचे प्रभावी माध्यम आहे. तुम्ही आजच पुढील लिंकवर क्लिक करून नमो ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा आणि भारतीय राज्यव्यवस्थेचा एक प्रमुख घटक बना. जागरूक, दक्ष, सजग आणि जबाबदार भारतीय नागरिक बना.
नमो ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://play.google.com/store/apps/details?id=com.narendramodiapp