महिलांना आर्थिक साहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’
राज्याचे अर्थसंकल्प २०२४ मध्ये राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यात विशेष करून गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी शासनाने अनेक हितकारी योजनांचा वर्षाव केला.
हे अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री मा. श्री. अजितजी पवार यांनी मांडले. या अर्थसंकल्पात त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रु. आर्थिक साहाय्य मिळणार आहे.
राज्यात १ जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली.
सविस्तरपणे जाणून घेऊया या योजनबद्दल…
* ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी आवश्यक कागदपत्रे :
- १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- हमीपत्र
- वरील पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्राच्या बाहेर जन्म झालेल्या महिलेने जर राज्यात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक होते, परंतु आता या योजनेत बदल करून ही अट काढण्यात आली आहे.
- त्याचप्रमाणे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील अशीही अट होती.
- आता ही अट देखील काढून टाकण्यात आली आहे.
- पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिलांना दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ५ एकरपेक्षा जास्त शेती असेल, अश्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नव्हत्या.
- या अटीमध्ये देखील बदल करण्यात आला असून जमिनीची अट शिथिल करण्यात आली आहे.
* ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी वयोमर्यादा :
- अगोदर या योजनेसाठी २१ ते ६० वयापर्यंतच्या महिला पात्र होत्या.परंतु आता या अटीतही बदल करण्यात आला असून वयाची मर्यादा ५ वर्षांनी वाढविण्यात आली आहे. आता २१ ते ६५ वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करू शकता.
* ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्याची मुदत :
- सुरुवातीला ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज कारण्याची मुदत १ जुलै ते १५ जुलै २०२४ ठेवण्यात आली होती.
- परंतु या योजनेत मुदतवाढ करून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ करण्यात आलेली आहे.
* ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी अर्ज कसा करावा ?
- योजनेचे पोर्टल, अॅप किंवा आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन योजनेसाठी अर्ज करता येतो.
- आपला अर्ज मंजूर झाल्यावर, आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम दर महिन्याला जमा होईल.