मंगरुळपीर इतिहास जाणून घेऊया थोडक्यात

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात असलेल्या मंगरूळपीर तालुक्याचे प्रशासकीय शहर हे मंगरूळपीर शहर आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने हिंदू व मुस्लिम आहे. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात ‘पीर’ असण्याचे कारण हेच आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर “मंगरुळनाथ” नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात.

श्री बिरबलनाथ महाराज यांची यात्रा ही खुप महत्वाची मानली जाते का तर जाऊन घेऊया इतिहास थोडक्यात:

अध्यात्मिक क्षेत्रात भारत प्राचिन काळा पासुनच समृध्द राहीलेला आहे. इथल्या अनेक महान योगी व ऋषिंनी अध्यात्मिक मार्गाने इश्वर प्राप्तिचे निरनिराळे उपाय सांगितले आहेत. भारतात योगी व महाऋषिंचे वेगवेगळे पंथ आहेत. यातच एक प्राचिन नाथपंथ असुन या पंथाच्या शाख़ा व उपशाख़ा देशाच्या अनेक भागात आढळतात या पंथात गुरुला असाधारण महत्व दिले जाते व गुरुनी सांगितलेल्या मार्गावर भक्त आपली भक्ती अनुसरतात. विदर्भात अकोला या जिल्ह्यापासुन ६५ कि. मी. दुर पश्चिमेला मंगरुळनाथ (मंगरुळपीर) ज्याचे काही वर्षांपृर्वीचे नाव “मंगलपुर” असे आहे हे तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिद्ध असुन संतांची भुमी आहे. दक्षिणेस वाशीम हे शहर ४० कि. मी. दुर व उत्तर दिशेला कारंजा (लाड) २७ कि. मी. दुर आहे.

१९व्या शतकात श्री बिरबलनाथ महाराजांच्या पवित्र चरणांनी या भुमीला स्पर्श करुन धन्य केले. मंगरुळनाथ ही त्यांची कर्मभुमी म्हणुन प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजीक सहिष्णुता जपुन लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. मनापासुन श्रध्दा असणार्या भक्तांना त्यांनी आपलेसे केले. व्यक्ती असो किंवा मुक प्राणी त्यांच्या प्रेमाची प्रचिती सर्वाना आली. गरिब–श्रीमंत, अजाण – ज्ञानी, हा भेदभाव न मानता त्यांनी आपले सत्कार्य लोकांसाठी अर्पण केले. माघ शध्द पौर्णिमेस शके १८४९ संवत्सर १९८४ ता. ४/२/१९२८ या दिवशी महाराजांनी जिवंत समाधी घेऊन त्यांनी आपला देह त्यागला त्यांच्या पुण्यातिथीच्या पाचव्या दिवशी महायात्रा भरवण्याचा नित्यक्रम आजही यथावह सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]