भाजपच्या निवडणूक संकल्पपत्रात विकसित भारताची ‘मोदी की गॅरंटी’ !
संपूर्ण देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकतेच आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. या संकल्पपत्रातून देशाचे कणखर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची दूरदृष्टी आणि राष्ट्र विकासाची तळमळ दिसून येते. भाजपच्या या संकल्पपत्रात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारधारेवर आधारित भाजपचे संकल्पपत्र आहे. यात देशातील गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार वर्गांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
* ‘मोदी की गॅरंटी’मधील महत्वाचे मुद्दे
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी भाजपने अनेक कल्याणकारी योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे –
- मोफत अन्नधान्य योजना ५ वर्षांसाठी वाढविणार.
- अन्नधान्याच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी आणि गरीब जनतेला परवडू शकतील अशाप्रकारे डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला उत्पादन स्वावलंबनावर भर देणार.
- पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार करणार.
- प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
- पीएम सूर्यघर योजनेमार्फत मोफत सौरऊर्जा.
- शून्य वीज बिलासाठी प्रयत्न.
- नवीन योजनेअंतर्गत ट्रकचालकांसाठी महामार्गावर आधुनिक सुविधा.
- कामगार आणि मजुरांना ई-श्रम पोर्टलद्वारे सक्षम, आत्मनिर्भरता.
* देशातील महिलावर्गासाठी :
- देशभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदी बचतगट उपक्रमाचा विस्तार.
- महिला बचतगटांना सेवा क्षेत्रात समकालीन करणार.
- बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी प्रयत्न.
- महिला वसतिगृहे आदी पायाभूत सुविधा विकसित करणार.
- सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अधिक शौचालयांची निर्मिती.
- स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी आरोग्य सेवांचा विस्तार.
- गृहिणींना स्वयंपाकघरापर्यंत पाइपद्वारे गॅस पुरवठा.
- नोकरदार महिलांसाठी वसतिगृह आणि शिशुगृह सुविधा.
- लोकसभा आणि विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणार.
* सक्षम युवाशक्तीसाठी :
- रोजगार-स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा कर्जाची रक्कम दुप्पट म्हणजे २० लाख रुपये करणार.
- सरकारी नोकर भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता
- उच्च शिक्षणासाठी नवीन संस्था स्थापन करणार.
- पेपरफुटी कायद्याची अंमलबजावणी करणार.
- भारताला उत्पादनाचे केंद्र बनविणार, ज्यामुळे रोजगार निर्मितीत वाढ
* शेतकरी बांधवांसाठी :
- पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना आणि दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार.
- तृणधान्याला सुपर फूड म्हणून प्रोत्साहन देणार.
- बियाणे ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ.
* वंचित, उपेक्षित वर्गासाठी :
- पंतप्रधान स्वनिधी आणि विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून OBC, ST आणि SC समाजातील लोकांसाठी रोजगाराची उपलब्धी.
- वंचित घटकांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
- मच्छीमारांच्या जीवनाशी निगडित बोटींचा विमा, फिश प्रोसेसिंग युनिट इत्यादी गोष्टींवर विशेष लक्ष.
* देशाच्या पायाभूत सुविधांसाठी :
- भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनविण्याचा संकल्प.
- एक्सप्रेस-वेचे जाळे १५ हजार किलोमीटरपर्यंत वाढविणार.
- नवीन विमानतळ, वॉटर मेट्रो, महामार्ग सुविधा वाढविणार.
- अमृत भारत, वंदे भारत या रेल्वेची संख्या वाढवणार.
- रेल्वे आसन क्षमता वाढवून तिकीट प्रतीक्षा यादी कमी करणार.
- पूर्व भारत तसेच लगतचा भाग विकासासाठी ‘पूर्वोदय मास्टर प्लॅन’
- अयोध्या शहराचा सर्वांगीण विकास तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर इतर धार्मिक स्थळांचा विकास.
- योग, आयुर्वेद, भारतीय भाषा, शास्त्रीय संगीत, भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन.
* देशभरात सुशासनासाठी :
- भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करणार.
- भारतीय न्यायिक संहिता लागू करणार.
- एक देश, एक निवडणूक आणि समान मतदारयादी व्यवस्थेसाठी प्रयत्न.
- संविधानाच्या कलम ४४ नुसार समान नागरी संहिता लागू करणार.
* समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी :
- ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत समावेश करून मोफत उपचार.
- ज्येष्ठ नागरिकांच्या यात्रेसाठी विशेष कार्यक्रम सुरु करणार. भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभा निवडणूक संकल्पपत्रात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या नीती आणि धोरणांचा समावेश केला आहे. देशातील १४० कोटी भारतीयांना उज्ज्वल भविष्याचे चित्र दाखविणारा हा खरेतर रोडमॅप आहे.