वीजबिल थकलेल्या ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना 2024

महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देणारी एक अनोखी योजना आणली आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीमुळे राज्यातील जवळपास ३८ लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात आले आहे. या ग्राहकांना दिलासा देणारी ही ‘महावितरण अभय योजना’ आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १,७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. कठोर कारवाईपासून ग्राहकांना दिलासा देणे हा या अभय योजनेचा हेतू आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही जागेचे मालक, खरेदीदार आणि ताबेदार यांना वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे अनिवार्य असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना सुविधा व्हावी यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे राज्यातील महावितरणच्या ज्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आलेला नाही. महावितरण अभय योजनेचा कालावधी १ सप्टेंबरपासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. वीज बिल थकबाकी असलेल्या ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५,०४८ कोटी इतकी रक्कम, तर १,७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख इतका विलंब आकार बाकी आहे. परंतु थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करून ग्राहकांना दिलासा देण्यात येईल.

* महावितरण अभय योजनेचा लाभ कसा घ्यावा?

  1. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अभय योजनेचा लाभ घेता येईल.
  2. महावितरणच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅपवरूनही योजनेत सहभागी होता येते.
  3. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कॉल करा या टोल फ्री क्रमांकांवर – १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५.योजनेअंतर्गत पैसे भरल्यानंतर ग्राहकाला पुन्हा नियमित वीज कनेक्शन सुरू करता येईल. सोबतच त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावानेदेखील वीज कनेक्शन घेता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]