तुम्हीही बनू शकता जगातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य । भाजप सदस्यता अभियान 2024 ।
जगातील सर्वात मोठ्या आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची सदस्यता मोहीम दर 6 वर्षांनी घेण्यात येते. हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्य लोकशाही तत्त्वावर चालते. दर 6 वर्षांनी सदस्यता मोहीम राबवून पक्षाचे पूर्णपणे लोकशाही पद्धतीने नूतनीकरण केले जाते. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकार आणि संघटना यांच्यातील माध्यम म्हणून कार्य करतात. जगातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान 2 सप्टेंबर 2024 पासून धडाक्यात सुरू झाले. देशाचे लाडके पंप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी या अभियानाचे उदघाटन करून सर्वप्रथम सदस्यत्व घेतले. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या समारंभात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डाजी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा, संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंहजी, अर्थमंत्री मा. श्रीमती निर्मलाजी सीतारामन, केंद्रीय मंत्री मा. श्री. पियुषजी गोयल यांनी सदस्यता मोहिमेच्या सुरुवातीला मिसकॉलद्वारे पक्षाचे सदस्यत्व घेतले.
देशभरात भाजपची ही सदस्यता मोहीम जोरदार प्रतिसादात सुरू आहे. भाजप सदस्यता मिळवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. आता तुम्हीदेखील तुमच्या मोबाईल फोनद्वारे जगातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 8800002024 या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल करावा लागेल.
* अशी मिळवा भाजपाची सदस्यता
देशभरात तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला भाजपचे सदस्य होता येईल. तुम्हाला भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर फक्त तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करा.
- मिसकॉल केल्यानंतर, तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यामध्ये तुमचा सदस्यता क्रमांक दिला जाईल.
- तुमचे भाजप सदस्यता कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील पद्धत वापरा.
- त्यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका.
- यानंतर तुम्हाला मेसेजमध्ये एक ओटीपी (OTP) येईल.
- हा ओटीपी टाकल्यानंतर तुमची माहिती भरा.
- यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग अशी माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सदस्यता कार्डसाठी प्रोफाइल फोटो अपलोड करा आणि दिलेली माहिती भरा.
- त्यानंतर तुमचा पत्ता, विधानसभा मतदारसंघ, राज्य इत्यादी माहिती भरा.
- ही सगळी माहिती भरल्यानंतर तुमचे भाजप सदस्यता कार्ड डाउनलोड करा.