प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे कोट्यवधी महिलांच्या जीवनात आनंद
भारतीय जनता पक्षाने आपल्या आजपर्यंतच्या सत्ताकाळात लोककल्याणाच्या अनेक योजना सक्षमपणे राबवल्या. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत कसा पोहचेल, यासाठी त्यांनी एक मजबूत यंत्रणा उभारली आहे. समाजातील प्रमुख घटक म्हणजे शेतकरी, कष्टकरी कामगार, महिलावर्ग आणि युवकांसाठी सरकारने हरतऱ्हेचे प्रयत्न केले आहेत. विशेषतः महिलांचे आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सरकार सातत्याने कार्यरत आहे.
ग्रामीण भागात आजही अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी रानावनात फिरून सरपण गोळा करावे लागते. तसेच चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या डोळ्यांवर आणि शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. सतत धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे अशा महिलांना खोकला, दमा, ह्रदयविकार असे आजार उद्भवतात. हे सर्व थांबवण्यासाठी २०१६ मध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यासोबतच सिलेंडर आणि सिलेंडरबरोबरची शेगडीदेखील देण्यात येते. या योजनेमुळे महिलांची धुराच्या संकटापासून मुक्तता झाली आहे. पुढे २०१८ साली या योजनेचा विस्तार करण्यात आला. आतापर्यंत ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या माध्यमातून देशातील १० कोटी महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.
* प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी कोणाला अर्ज करता येतो?
– अर्ज करताना महिलेचे वय किमान १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
– लाभार्थी महिला ही दारिद्र्यरेषेखालील असावी.
– लाभार्थी महिलेकडे आधीचे गॅस कनेक्शन नसावे.
—
* अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
– जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
– दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड असणे आवश्यक
– सोबतच आधार कार्ड आणि कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रे
– उत्पन्नाच्या दाखल्यावर पत्त्याचा पुरावा असायला हवा.
– पासपोर्ट साईज फोटो आणि E-KYC देखील अनिवार्य
– लाभार्थी महिलेचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड बंधनकारक
—
* अर्ज कसा करायचा ?
– अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– होमपेजवर डाउनलोड फॉर्मवर जा.
– फॉर्ममध्ये आपले नाव, ई-मेल, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
– OTP जनरेट करण्यासाठी क्लिक करा.
– यानंतर तुमचा फॉर्म डाउनलोड करा.
हा फॉर्म तपशीलवार भरून जवळच्या LPG गॅस एजन्सीकडे दाखल करा.
‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यवधी महिलांना मोफत घरगुती LPG गॅस उपलब्ध करून दिल्याने देशातील महिलांचे जीवन सुखावले आहे. ही योजना यशस्वीरीत्या राबविल्याने महिला सक्षमीकरण तर साध्य झालेच, शिवाय एक कुटुंबही आनंदी झाले. घरातील महिलांचे आरोग्य जपण्याकामी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरले. सरपणासाठी होणारी वृक्षतोड थांबली. पर्यावरणाचा ऱ्हास थांबला. त्यामुळेच स्वयंपाकाच्या धुरातून मुक्त झालेल्या कोट्यवधी महिला पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देतात.
धन्यवाद मोदीजी !