आयुष्मान भारत योजनेमुळे भारतीय जनता आरोग्यसंपन्न !
। आयुष्मान भारत दिवस २०२४ ।
भारतीय जनतेला आरोग्य समस्यांवर होणाऱ्या मोठ्या खर्चातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना’ आहे. देशातील दारिद्र्यरेषेखालील जनता आणि ज्यांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी होणारा मोठा खर्च परवडत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांसाठी देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना’ सुरू केली. या योजनेचे स्मरण करण्यासाठी, तसेच महत्व लक्षात आणून देण्यासाठी ३० एप्रिल हा दिवस ‘आयुष्मान भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य उपचार सुविधा दिल्या जातात. दरवर्षी प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपये आरोग्य संरक्षण देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
* काय आहे आयुष्मान भारत ?
– या योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ देते.
– या कार्डद्वारे रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार घेता येतात.
– औषधे आणि वैद्यकीय चाचण्यांचा खर्चदेखील या योजनेत समाविष्ट आहे.
– या योजनेत वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना आणि राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनांचा समावेश झाला आहे.
– या योजनेत केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांपेक्षा १५% स्वस्त दराने गुडघा बदल, बायपास सर्जरी तसेच इतर उपचारांचा समावेश आहे.
—
* आयुष्मान भारतसाठी अर्ज कसा करावा?
– या योजनेत कोणीही Online किंवा Offline पद्धतीने अर्ज करू शकते.
– लाभार्थ्याचे वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
– स्वतःहून अर्ज करत असाल तर तुमचे नाव SECC मध्ये असणे अनिवार्य आहे.
– SECC म्हणजे सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणना.
– ‘आयुष्यमान भारत’साठी अर्ज करताना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
– यानंतर आपला मोबाईल क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
– यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.
– यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल.
– यात आपले राज्य निवडा.
– मागितलेली माहिती टाका. जसे की मोबाईल नंबर, नाव, रेशनकार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर.
– जर तुमचे नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात.
– याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊनही पात्रता तपासू शकता.
—
दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना तृतीय आणि दुय्यम वैद्यकीय विमा प्रदान करण्यासाठी ‘आयुष्यमान भारत योजना’ महत्वपूर्ण आहे. या योजनेमुळे अनेक गरजू लोकांना मोफत उपचार मिळणे शक्य झाले आहे. ही योजना भारताला आयुष्मान करणारी आहे, हे निश्चित.
—-