मोफत तीर्थदर्शन घडवणारी राज्य शासनाची नवी योजना

माणसाच्या जीवनात भक्तिभाव आणि असलेल्या श्रद्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मिळालेल्या या आयुष्यात एकदा तरी ईश्वराचे डोळे भरून दर्शन व्हावे, त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लाभावी, या इच्छेने राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध तीर्थस्थळांना लाखो भाविक दरवर्षी भेट देतात. ईश्वराच्या नुसत्या दर्शनानेही या जन्माचे सार्थक झाल्याची भावना यामागे दडलेली असते. महाराष्ट्रातील भाविक-भक्तांसाठी आता राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल ६६ तीर्थक्षेत्रांना आणि देशभरातील ७३ धार्मिक स्थळांना भेटी देता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे.

ही आहेत ६६ तीर्थक्षेत्रे

चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ (कॅवेल), सेंट अंड्र्यू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीप्झ (अंधेरी), गोदीजी पार्श्वनाथ मंदिर, नेसेट एलियाहू, शार हरहमीम सिनेगॉग, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग (भायखळा), सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च (ठाणे), अग्यारी-अग्निमंदिर (ठाणे), मयूरेश्वर मंदिर (मोरगाव), चिंतामणी मंदिर (थेऊर), गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री), महागणपती मंदिर (रांजणगाव), खंडोबा मंदिर (जेजुरी), संत ज्ञानेश्वर महाराज समाधी (आळंदी), भीमाशंकर ज्योतिर्लिंग (खेड), संत तुकाराम महाराज समाधी (देहू), संत चोखामेळा महाराज समाधी (पंढरपूर), संत सावतामाळी महाराज समाधी (माढा), श्री विठ्ठल मंदिर (पंढरपूर), शिखर शिंगणापूर (सातारा), महालक्ष्मी (कोल्हापूर), ज्योतिबा (कोल्हापूर), जैन मंदिर (कोल्हापूर), रेणुकादेवी मंदिर (माहूर), गुरुगोविंदसिंगजी समाधी (नांदेड), खंडोबा मंदिर (मालेगाव), संत नामदेव देवस्थान (उंब्रज, नांदेड), तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर), संत एकनाथ महाराज समाधी (पैठण), घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (वेरूळ), जैन स्मारके, वेरूळ लेणी, विघ्नेश्वर (ओझर, नाशिक), संत निवृत्तीनाथ समाधी (नाशिक), त्र्यंबकेश्वर मंदिर, फेरी नाशिक, सप्तशृंगी (वणी), काळाराम मंदिर नाशिक, मांगी-तुंगी जैन मंदिरे (नाशिक), गजपंथ (नाशिक), सिद्धिविनायक मंदिर (नगर), शनी शिंगणापूर, श्रीक्षेत्र भगवानगड (नगर), बल्लाळेश्वर (पाली), गजानन महाराज मंदिर (शेगाव), एकवीरा देवी (कार्ले), दत्त मंदिर (औदुंबर), केदारेश्वर मंदिर (बीड), वैजनाथ मंदिर (परळी), पावस, गणपती पुळे, मार्लेश्वर (रत्नागिरी), महाकाली देवी (चंद्रपूर), काळूबाई मंदिर (सातारा), अष्टदशभुज (रामटेक), नागपूर दीक्षाभूमी, चिंतामणी (कळंब).

देशभरातील ७३ धार्मिक स्थळे

वैष्णोदेवी मंदिर, यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी, कामाख्यादेवी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, अमरनाथ गुहा, बैद्यनाथ धाम, देवघर, गुवाहाटी, ओंकारेश्वर मंदिर, ममलेश्वर मंदिर खंडवा, ब्रह्मपुरी, सुवर्णमंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, महाबोधी मंदिर, श्री रंगनाथस्वामी मंदिर, अक्षरधाम मंदिर, वाराणसी, रणकपूर मंदिर, पाली गोमटेश्वर मंदिर, श्री दिगंबर जैन लाल मंदिर, इस्कॉन मंदिर, वृंदावन, अजमेर दर्गा, विरुपाक्ष मंदिर, हम्पी, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीराम मंदिर, अयोध्या, सोमनाथ मंदिर, वेरावळ, चेन्नकेशव मंदिर, बेलूर, बद्रीनाथ मंदिर, सूर्यमंदिर कोणार्क, द्वारकाधीश मंदिर, द्वारका, अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडू, गंगोत्री मंदिर (उत्तरकाशी), श्री जगन्नाथ मंदिर पुरी, नागेश्वर मंदिर, द्वारका, महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण, केदारनाथ मंदिर, लिंगराज मंदिर, भुवनेश्वर, सांची स्तूप, भूतनाथ मंदिर, बदामी, नीलकंठ महादेव मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर, खजुराहो मंदिर, मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर, आयहोल दुर्गा मंदिर, कांचीपुरम मंदिर कांचीपुरम, रंगनाथस्वामी मंदिर, त्रिची अरुणाचलेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर उडुपी, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम सारंगपाणी मंदिर, कुंभकोणम, वीर नारायण मंदिर, बेलावडी, किनारा मंदिर, महाबलीपुरम, मुरुगन मंदिर, तिरुचेंदूर, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, गुरुवायूर मंदिर गुरुवायूर, वडक्कुन्नाथन मंदिर, त्रिशूर, अटुकल भगवती मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम, पार्थसारथी मंदिर, अरनमुला शबरीमाला मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायूर, बृहदीश्वर मंदिर, तंजावर थिरुनेल्ली मंदिर, वायनाड वैकोम महादेव मंदिर, वर्कला तिरुवल्ला मंदिर, तिरुवल्ला मीनाक्षी मंदिर, मदुराई, शिवगिरी मंदिर, वर्कला, श्री सम्मेद शिखरजी, शत्रुजय हिल, रामनाथस्वामी मंदिर, गिरनार, देवगड, पावापुरी, रणकपूर दिलवाडा टेंम्पल, उदयगिरी.

लाभ कोणाला मिळणार?

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे, हे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

काय पात्रता आवश्यक?

* लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
* वय वर्षे ६० आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक.
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

* योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
* लाभार्थ्याचे आधार कार्ड / रेशनकार्ड
* महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
* सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड
* वैद्यकीय प्रमाणपत्र
* पासपोर्ट आकाराचा फोटो
* जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
* सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
* योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?
* योजनेचा अर्ज पोर्टल / मोबाईल अॅपद्वारे / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो.
* पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
* ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
* अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराकडे खालील माहिती असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची निवड कशी होणार?

प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]