लाडकी बहीण योजना प्रचाररथ पोहचला वाशिममधील गावागावांत !
राज्यभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गतिमान महायुती सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची वाशिम जिल्ह्यात जोरदार जनजागृती करण्यात येत आहे. आपुलकीची जाण, सर्वांचा सन्मान याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सर्व वाडी, तांडे आणि वस्त्यांपर्यंत या योजनेचा प्रसार व्हावा, यासाठी भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक मा. श्री. राजू पाटील राजे यांचे प्रचाररथ ग्रामीण भागात जोरदार जनजागृती करीत आहेत. याद्वारे त्यांनी ग्रामीण दुर्गम भागातील महिलांचे अर्ज भरण्याची पूर्णतः मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावात योजनेचा प्रचाररथ जात असल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला भगिनींची चांगलीच सोय झाली आहे. भाजप नेते श्री. राजू पाटील राजे यांच्या या उपक्रमाला ग्रामीण, तसेच शहरी भागांतूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येक गाव आणि प्रत्येक सर्कल
गतिमान महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी, तसेच तळागाळातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने श्री. राजू पाटील राजे स्वतः गावोगाव महिला भगिनींशी संवाद साधून, त्यांना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यासाठी सुसज्ज ठेवलेल्या प्रचाररथांनी अख्खा वाशिम जिल्हा पिंजून काढला आहे. आजपर्यंत २० हून अधिक सर्कलमध्ये प्रत्येक गावात लाडकी बहीण योजना प्रचाररथ पोहचला आहे. यात कारंजा तालुक्यातील धनज बु. सर्कल, भामदेवी सर्कल, मनभा सर्कल, उंबर्डा बाजार सर्कल, कामरगाव सर्कल, काजळेश्वर सर्कल, पोहा सर्कल, धामणी खडी सर्कल, मानोरा तालुक्यातील इंझोरी सर्कल, कुपटा सर्कल, तळप बु. सर्कल, आसोला खु. सर्कल, गिरोली सर्कल, शेंदुरजना सर्कल, फुलउमरी सर्कल, पोहरादेवी सर्कलसह गावागावात योजनेची माहिती दिली जात आहे. भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक मा. श्री. राजू पाटील राजे यांनी प्रमुख गावांमध्ये जनसेवा मदत केंद्रांची उभारणी करून त्या त्या भागातील महिलांचे अर्ज तातडीने भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तीही पूर्णतः मोफत. यामुळे ग्रामीण महिलांना खूपच फायदा झाला आहे.
भेटीगाठी आणि विकास प्रश्नांवर चर्चा
लाडकी बहीण योजनेच्या प्रचारादरम्यान श्री. राजू पाटील राजे यांनी भारतीय जनता पक्षाच्या आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून विकास प्रश्नांवर मोठे विचारमंथन घडवून आणले. वाशिम जिल्ह्यात गावागावांत जाऊन तेथील नागरी समस्या, विकास प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजप नेते श्री. राजू पाटील राजे नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या कार्यक्रमाला गावोगावच्या नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स, व्यावसायिक, व्यापारी बंधू, कृषी सेवा केंद्रचालकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान महिला, माता-भगिनींची भेट घेऊन त्यांना लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. भाजप नेते श्री. राजू पाटील राजे यांनी कारंजा आणि मानोरा तालुक्यातील कारंजा शहर, मंगरूळनाथ शहर, कामरगाव (ता. कारंजा) जनुना (ता. कारंजा), शाहा (ता. कारंजा), तळप बुद्रुक (ता. मानोरा) यासह विविध गावांना भेटी दिल्या. श्री. राजू पाटील राजे यांच्या या उपक्रमाचा ग्रामीण महिलांना खूपच फायदा झाला आहे.