देशातील प्रत्येक घरासाठी हर घर जल योजना । जल जीवन मिशन ।

देशाचे कणखर नेतृत्व लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी प्रगत आणि विकसित भारताचे ध्येय समोर ठेवून देशात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी दमदार पावले उचलली आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजनांची निर्मिती करून त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी व्हावी, याकडेही लक्ष पुरवले आहे. देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्यासाठी हर घर जल योजना कार्यरत आहे.

देशात अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असते. ग्रामीण भागामध्ये लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागतो. ग्रामीण भागात आजारांचे प्रमाण वाढण्यासाठी दूषित पाणी हे एक प्रमुख कारण आहे. दूषित पाणी पिल्याने लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. औषधोपचार, आरोग्यसेवा यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. त्यातच जलजन्य आजारांमुळे जर कुटुंबातील कमावणारी व्यक्ती बाधित झाली तर त्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात दूषित पाणी पिल्यामुळे सुमारे १,२५,९९५ नागरिकांचा अतिसारामुळे मृत्यू झाला होता. ही संख्या चिंताजनक आहे. देशात राहणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी जर शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध झाले, तर अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून संरक्षण तर होतेच, सोबतच चांगले आरोग्य, उत्पादकता वाढ, आर्थिक उन्नती आणि देशाची सर्वांगीण प्रगती साध्य होते.

प्रगत, विकसित भारताचे चित्र डोळ्यासमोर ठेवून देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी २०१६ साली ‘हर घर जल योजना’ आणली. या योजनेमुळे कोट्यवधी घरांत नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने आजारांपासून सुरक्षा मिळत आहे. देशातल्या ग्रामीण भागातील १९०.४० दशलक्ष घरांना सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने नळांमार्फत पिण्यायोग्य पुरेसे पाणी उपलब्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे. घरोघरी शुद्ध पाणी मिळाल्याने अतिसार या आजारामुळे होणारे संभाव्य ४ लाख मृत्यू टाळता येणे शक्य झाले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण आणि शुद्ध पाणी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रकल्प काळात लोकांना आणि गावपातळीवरील संस्थांना सातत्यपूर्ण साहाय्य करणे आवश्यक आहे. जल जीवन मिशन गावस्तरावर राबविण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील विविध यंत्रणांची मदत घेण्यात येते.

  • हर घर जल योजनेची अंमलबजावणी
  • पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असणाऱ्या गावांमध्ये कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी योग्य आणि आवश्यक मदत करणे.
  • योजना हस्तांतरण प्रक्रियेसाठी गावाचे संघटन आणि प्रत्यक्ष योजनाच्या सहभागासाठी प्रयत्न.
  • केंद्र आणि राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाणी व्यवस्थापन मोहिमेत गावाला साहाय्य.

जल जीवन मिशनमुळे ग्रामीण कुटुंबातील नळजोडणीच्या टक्केवारीमध्ये सन २०१९ ते २०२४ दरम्यान १६.६९ टक्क्यांवरून ७५.१८ टक्क्यांपर्यंत उल्लेखनीय वाढ झालेली आहे. जल जीवन मिशन, हर घर जल योजना ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]