व्यापारीदृष्ट्या महत्वाचे रिसोड
रिसोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे. रिसोड हे हिंगोली जिल्ह्यातील तसेच रिसोड तहसीलमधील लोकांसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे.
पेनगंगा ही गोदावरी नदीची उपनदी असून रिसोड तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे. रिसोड जवळील प्रमुख शहरे आहेत: नांदेड (140 किमी) दूर, संभाजीनगर (औरंगाबाद) 180 किमी दूर, नागपूर 323 किमी दूर, पुणे 430 किमी दूर, मुंबई 500 किमी दूर आहे. रिसोड जवळील प्रमुख विमानतळ (व्यावसायिक) आहेत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर छत्रपती संभाजीमहाराज विमानतळ संभाजीनगर (औरंगाबाद). श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ, नांदेड आणि रिसोड जवळील आपत्कालीन विमानतळ अकोला आणि यवतमाळ आहेत. रिसोड जवळील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत: हिंगोली, अकोला आणि वाशीम.
वाशिम हा एक महाराष्ट्रातील जिल्हा आहे. 1998 मध्ये अकोला जिल्ह्यातून वेगळा झालेला वाशिम जिल्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म असे होते.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका मराठवाड्याच्या सीमेस लागून आहे. रिसोडला कापसाची व अन्य कृषी उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे. हे एक पौराणिक शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमी म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. रिसोड हे तलावांचे गाव म्हणूनही एकेकाळी प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्कर आपले तळ ठोकून असत. आजही येथे पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे.