गतिमान विकासरथ आता आणखी वेगात ! महाराष्ट्र विकासाची सूत्रे मा. देवभाऊंकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज दुपारी नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाचा आज मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व अन्य मंत्रिमहोदयांचे हार्दिक अभिनंदन ! महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज पद गोपनीयतेची शपथ ग्रहण करतील. महाराष्ट्राचे महानेते ठरलेले सर्वांचे लाडके मा. देवाभाऊ यांच्या नावावर या शपथविधीसह इतरही अनेक रेकॉर्डची नोंद होणार आहे. आजवर महाराष्ट्राचा कोणताच उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री झाला नव्हता, तो पायंडा मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस हे मोडीत काढणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन मा. देवाभाऊ एक नवा रेकॉर्ड करणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर राहून मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिलेच नेते ठरणार आहेत.

असे आहेत आमचे लाडके देवाभाऊ
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस

मा. देवेंद्रजी फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते आहेत. त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नगरसेवक पदापासून सुरु झाला. त्यांनी आधी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यांचा अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी यामुळेच भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करुन मुद्देसूद मांडणी करुन ते बोलतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक गुण म्हणजे टीका सहन करण्याची क्षमता. ते कधीही अन्य नेत्यांसारखे आरडाओरड, आदळआपट करीत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर टीका होते, राजकीय आव्हाने असतात, पण तरीही त्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर अनेक संकटे आली, पण त्यांनी सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले. आताच सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्यावेळी त्यांनी चांगल्या टीम लीडरप्रमाणे जबाबदारी स्वीकारून पायउतार होण्याची तयारीसुद्धा दाखवली, पण भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आज त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. आज महाराष्ट्र भाजपमध्ये मा. देवाभाऊंच्या नावाचा बोलबोला आहे. हे त्यांच्या राजकीय कौशल्याचे यश आहे. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासात नेत्रदीपक भर घातली आहे. मा. देवाभाऊंना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या साडेसात वर्षाच्या सत्ताकाळात पायाभूत सोयी-सुविधाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. महत्त्वाचे म्हणजे सुरु केलेले प्रकल्प त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले. उदहारणार्थ मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड. त्यामुळे मा. देवाभाऊंचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला.

महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या गतिमान महायुती सरकारला पुढील भव्यदिव्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]