‘एक देश, एक निवडणूक’ देशाला मजबूत करणारा कायदा !

एक देश, एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची प्रक्रिया. यामुळे संपूर्ण देशात एकाच वेळेस मतदान होईल, ज्यामुळे वेळ आणि साधनसंपत्तीची बचत होईल. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नुकतेच संसदेत ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयक संसदेत मांडले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसह “एक देश, एक निवडणूक” विधेयक सादर करण्यामागे अनेक उद्दिष्टे आहेत ! देश मजबूत आणि विकासाच्या दिशेने टाकणारे हे मोदी सरकारचे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे.

प्रशासनाची सुसूत्रता निश्चित होईल

भारतातील वारंवार निवडणुका होत असल्याने प्रशासकिय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत कायम गुंतलेली असते. यामुळे विकासकामे ठप्प होत असतात. एकाचवेळी निवडणुका घेतल्यास प्रशासनाला इतर कामांसाठी अधिक वेळ मिळेल. तसेच प्रशासनाची सुसूत्रता या कायद्याने निश्चित होण्यासही मदत होईल. सततच्या निवडणुकांत शासनाचे अनेक विभाग व विभागातील महत्वाचे अधिकारी निवडणूक आयोगाच्या कामकाजात व्यस्त असल्याने त्यांचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जनतेची होणारी ही परवड देखील या कायद्याने थांबणार आहे.

वेळ आणि खर्चाची बचत होईल

सध्या होत असलेल्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. विविध निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्याने हा खर्च अधिक वाढतो. जर सर्व निवडणुका एकाचवेळी घेतल्या गेल्या, तर निधीची बचत होईल. आणि तो पैसा जनकल्याणासाठी वापरता येईल. अवाजवी मनुष्यबळ सध्या होणाऱ्या निवडणुकीत विनाकारण खर्च होत आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या देशाच्या तिजोरीवर भार पडत आहे तो वेगळाच. या कायद्याने भारतीय कार्यकारी प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशातून करांच्या स्वरूपातून आलेला पैसा वाया आत वाजणार नाही.

राजकीय पक्षांचा ताण हलका होणार

सततच्या निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचारावर जास्त लक्ष द्यावे लागते. हे विकास कामांवर परिणाम करू शकते. एकाचवेळी निवडणुका झाल्यास राजकीय पक्षांना स्थिरतेसाठी काम करता येईल. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनाही या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यस्त राहावे लागते. तसेच नागरिकांनाही वेळोवेळी काम सोडून मतदानासाठी हजर राहावे लागते. या कायद्यामुळे हा ताण हलका होण्यास मदत मिळणार आहे.या कायद्याने सरकार अधिक गतिशील होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतांना दिसेल.

मतदारांची संभ्रमावस्था दूर होईल

सततच्या निवडणुकांमुळे अनेकदा मतदार गोंधळलेले असतात. एकाचवेळी निवडणुका घेतल्यास नागरिकांना निवड प्रक्रियेत अधिक सहभाग घेता येईल आणि मतदारांना एकाच वेळेस केंद्र व राज्य सरकारसाठी विचारपूर्वक मतदान करू शकतील, ज्यामुळे एकसंध दृष्टिकोन वाढीस लागून मतदारांचा समन्वय साधता येईल. याबरोबरच वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कामात अडथळा येतो. एकत्र निवडणुका घेतल्यास हे कमी होईल. यासाठी सर्व संसाधन आणि साधने याच्या विचार करून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ हा देशाला मजबूत आणि विकसित करणारा कायदा आणला आहे. जो सर्वसामान्य माणसापासून शासनातील सर्व विभागांना साहाय्यक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]