राजू पाटील राजे यांनी वाढदिवसातून जपला सामाजिक सौहार्द आणि सलोखा !
वाढदिवस हा प्रत्येकासाठीच खास दिवस असतो ! हा दिवस कायम स्मरणात राहावा असा प्रत्येकाचा अट्टहास असतो, म्हणून जो तो व्यक्ती आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्या परीने वाढदिवस साजरा करतो. भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक, धडाडीचे भाजप नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री. राजू पाटील राजे यांनीही आपल्या वाढदिवसातून सामाजिक सौहार्द आणि सलोखा जपला. दि. १९ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस. याप्रसंगी झगमगाटापेक्षा सामाजिक सेवेला महत्व दिले. समाजातील ज्येष्ठ आणि गरजू लोकांचा आशीर्वाद घेत वाढदिवस साजरा करणे त्यांनी पसंत केले.
* आनंद वृद्धाश्रमास भेट, विचारपूस
आई-वडिलांना देवस्थानी मानणाऱ्या राजु पाटील राजे यांना वृद्धाश्रमातील लोकांबद्दल नेहमीच आपुलकी वाटते. बेलखेड येथे माँ जगदंबा वृद्धाश्रम संस्थाश्रम द्वारा संचालित आनंद वृद्धाश्रम आहे. मंगळसा, धोत्रा, गणेशपूर, उमरखेड, वार्डा गिर्डा येथील काही वृद्ध या वृद्धाश्रमात निवास करतात. त्यांना सहानुभूती आणि आपुलकीची गरज असते म्हणून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजु पाटील राजे यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. वृद्धाश्रमातील लोकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. थंडीच्या दिवसात या वृद्धांना मायेची ऊब मिळावी म्हणून राजू पाटील राजे यांनी ब्लॅंकेटचे वाटप केले. वृद्धांनीही त्यांना आपल्या मुलाप्रमाणे प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यानंतर राजु पाटील राजे यांनी रिसोडमधील गरजू आणि बेघर लोकांनाही ब्लॅंकेट देत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणले.
* शालेय साहित्याचे वाटप
आपला वाढदिवस त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला. रिसोड तालुक्यातील लोणी बु., लोणी खु., कनेरी, मोप, मोहजा बंदी, असोला इत्यादी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी एखाद्या मित्राप्रमाणे मनसोक्त संवाद साधला. विद्यार्थीही त्यांच्या मनमिळाऊ वृत्तीने त्यांच्यात मिसळून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मिळालेले साहित्य पाहून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि राजु पाटील राजे यांच्या चेहऱ्यावर दिसत होते एक वेगळे समाधान!
* युवकांचे प्रेरणास्थान राजु पाटील राजे
वाशिममधील जनतेमध्येही राजु पाटील राजे हे अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या समर्थकांनी, मित्रवर्गाने आणि आप्तेष्टांनी देखील त्यांचा वाढदिवस साजरा केला. राजू पाटील राजे हे युवकांचे प्रेरणास्थान असल्याने याप्रसंगी युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छांनी त्यांचे मन भरून आले होते. लोकांचे इतके प्रेम वाढदिवसाची भेट म्हणून पुरेसे होते. प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांवर या अफाट प्रेमाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देत त्यांनी आभार व्यक्त केले.
थोडक्यात काय, आपल्या वाढदिवसाला झगमगाट आणि दिखाऊपणा टाळून लोकनेते राजू पाटील राजे यांनी समाजाचे अपार प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद मिळविले.
धन्य तो नेता !