ज्येष्ठ नागरिकांच्या हिताची ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

ज्ञान, अनुभव यांचा खजिना असलेले ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने त्या घराचा आधार असतात. वय जसजसे वाढत जाते, तसतसे शरीर थकते. उतारवयात अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. दवाखाना, औषधोपचार यावर खूप पैसे खर्च होतात. आर्थिक तारांबळ होते. जनगणना २०११ नुसार महाराष्ट्र राज्यात १० ते १२% लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. यातील बरेच […]

वीजबिल थकलेल्या ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना 2024

महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देणारी एक अनोखी योजना आणली आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीमुळे राज्यातील जवळपास ३८ लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात आले आहे. या ग्राहकांना दिलासा देणारी ही ‘महावितरण अभय योजना’ आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना […]

तुम्हीही बनू शकता जगातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य । भाजप सदस्यता अभियान 2024 ।

जगातील सर्वात मोठ्या आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची सदस्यता मोहीम दर 6 वर्षांनी घेण्यात येते. हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्य लोकशाही तत्त्वावर चालते. दर 6 वर्षांनी सदस्यता मोहीम राबवून पक्षाचे पूर्णपणे लोकशाही पद्धतीने नूतनीकरण केले जाते. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकार आणि संघटना यांच्यातील माध्यम म्हणून कार्य […]

देशातील प्रत्येक घरासाठी हर घर जल योजना । जल जीवन मिशन ।

देशाचे कणखर नेतृत्व लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी प्रगत आणि विकसित भारताचे ध्येय समोर ठेवून देशात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी दमदार पावले उचलली आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजनांची निर्मिती करून त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी व्हावी, याकडेही लक्ष पुरवले आहे. देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्यासाठी […]

लाडकी बहीण योजना प्रचाररथ पोहचला वाशिममधील गावागावांत !

राज्यभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गतिमान महायुती सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची वाशिम जिल्ह्यात जोरदार जनजागृती करण्यात येत आहे. आपुलकीची जाण, सर्वांचा सन्मान याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सर्व वाडी, तांडे आणि वस्त्यांपर्यंत या योजनेचा प्रसार व्हावा, यासाठी भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक मा. श्री. राजू पाटील राजे यांचे प्रचाररथ ग्रामीण भागात जोरदार जनजागृती करीत आहेत. याद्वारे […]

समस्त देशवासीयांचे हित साधणाऱ्या सरकारच्या कल्याणकारी योजना

जनकल्याणाचा वसा घेतलेले देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रबळ विश्वास आणि देशाला प्रगतीकडे नेणारे प्रभावशाली कर्तृत्व यामुळे जनतेने सलग तिसऱ्यांदा भारताची सत्तासूत्रे त्यांच्या हाती दिली आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध आहे. देशातील तळागाळातील घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने सरकारने अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. या […]

शासनाच्या शेतकरी हिताच्या तीन महत्वपूर्ण योजना

भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. संपूर्ण जगाचे पोषण करणारा बळीराजा आनंदी, समृद्ध झाला तर त्याचा परिणाम आपोआपच देशाच्या अर्थचक्रावर होतो. देश स्वयंपूर्णतेकडे, प्रगतीकडे वाटचाल करू लागतो. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी लक्षात घेऊन, त्यानुसार शेतकरी हिताच्या राज्यव्यापी धोरणांची अंमलबजावणी झाली तर निश्चितच शेतीला चांगले दिवस येतील. नैसर्गिक संकट, अवर्षण, दुष्काळ, […]

प्रगत भारताची मुहूर्तमेढ रोवणारा केंद्रीय अर्थसंकल्प

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी, २३ जुलै २०२४ रोजी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सलग ७ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये सर्व समाज घटकांच्या हितासाठी सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भरघोस निधीची तरतूद करून, एकप्रकारे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भविष्यातील प्रगत आणि विकसित भारताचे रेखाचित्र भारतीय […]

उद्योगी महिलांच्या पंखांना बळ देणारी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

देशाच्या विकासात महिलाशक्तीचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वतःचे कुटुंब अगदी व्यवस्थितरीत्या सांभाळणारी महिला उद्योग – व्यवसाय क्षेत्रातही स्वकर्तृत्वाच्या बळावर उत्तुंग झेप घेताना दिसते. महिलांच्या या उद्योग कौशल्याला आर्थिक बळ देणारी योजना नुकतीच महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत आता महिलांनाही स्वतःच्या उद्योग उभारणीसाठी, विस्तारासाठी भक्कम अर्थसाह्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे […]