भविष्याचा अचूक वेध घेऊन भारताचे कणखर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने नुकतीच गौरवशाली ११ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या अकरा वर्षांच्या काळात भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसाय, राष्ट्रसंरक्षण, भारतीयांचे जनजीवन, धर्म जागरण, संस्कृती रक्षण अशा विविध पातळ्यांवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने घेतलेल्या कठोर निर्णयांची ठळक छाप दिसून येते. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने प्रगत, विकसित, मजबूत भारताच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला आहे. देशातील १५० कोटी जनतेच्या चेहऱ्यावर आज जे समाधानाचे, स्वाभिमानाचे हास्य दिसते ते फक्त आणि फक्त श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे. विकसित जगाच्या पटलावर आज आपला भारत देश ताठ मानेने उभा आहे. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी प्रबळ अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा खरा सुवर्णकाळ आज समस्त देशवासी अनुभवत आहेत. जे ७० वर्षात कुणाला जमले नाही ते श्री. नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवले. म्हणूनच तर सगळीकडे एकच उद्घोष सुरु आहे… मोदी है तो मुमकिन है ! भारताच्या विकासाचा एक नवा अध्याय गेल्या ११ वर्षांमध्ये रचला गेला.
प्रत्येक भारतीयाने पाहिलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारणाऱ्या या नव्या युगाचा प्रारंभ २०१४ मध्ये झाला. भारताच्या नेत्रदीपक प्रगतीसाठी एकापेक्षा एक धडक निर्णय घेऊन मोदी सरकारने जगभरात भारताची मान उंचावली. जागतिक घडामोडींमध्ये आपला भारत आज ताठ मानेने उभा आहे, याचे सर्व श्रेय जाते देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना. भारताच्या प्रगतीचा हा प्रवास आहे ११ वर्षांच्या विश्वासाचा, नेत्रदीपक प्रगतीचा आणि कठोर कणखर निर्णयांचा !
* भारताने धडाकेबाज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवादाच्या नांग्या ठेचल्या.
* भारतीय सैन्यदलाचे आधुनिकीकरण करून सरकारने राष्ट्र संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊले चालली. आज जगभरात भारतीय सेनेचा दबदबा आहे.
* कलम ३७० हटवून काश्मिरी जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.
* सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
* मुस्लीम माता-भगिनींना न्याय मिळवून देणारा तीन तलाक कायदा अस्तित्वात आणला.
* निरामय आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारताने जगाला योगशास्त्राची अद्वितीय भेट दिली. आज जगभरात २१ जून रोजी योग दिन साजरा केला जातो.
* डिजिटल इंडियाद्वारे नागरी सेवांचे आधुनिकीकरण केले.
* वन नेशन, वन रेशनद्वारे देशभरात कुठेही धान्य वितरणाचा निर्णय, ८० करोड गोरगरिबांना याद्वारे मोफत धान्य मिळत आहे.
* छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून भारतीय नौदलाला नवीन ध्वजचिन्ह मिळाले.
* प्रधानमंत्री जन धन योजनेतून कोट्यवधी कुटुंबांची आर्थिक पत वाढवली.
* भारताला आत्मनिर्भर बनवणारी मेक इन इंडिया पॉलिसी
* कोट्यवधी महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्त करणारी उज्ज्वला गॅस योजना
* आयुष्मान भारत योजनेद्वारे लाखो कुटुंबांना महागड्या उपचार खर्चातून दिलासा मिळाला. ही योजना आरोग्याचा आधार ठरली.
* भारताचा पोशिंदा बळीराजाला सन्मान निधीने भरघोस ताकद दिली. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत होत आहे.
* भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नातून कोविडच्या जीवघेण्या संकटावर विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण घडवून आणले.
* पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेतून स्वतःच्या पायावर लाखो युवा उद्योजक स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांच्या नवनवीन उद्योगांना चालना देण्याचे काम या योजनेने केले.
* सेंट्रल व्हिस्टा हा श्री. मोदीजींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. याद्वारे नव्या संसद भवनाचे निर्माणकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
* श्री. मोदीजींच्याच कार्यकाळात राजपथ बनला कर्तव्यपथ
* वंदे भारत एक्सप्रेसद्वारे भारतीयांना मिळाली गतिमान, सुरक्षित प्रवासाची अनोखी भेट. वंदे भारत रेल्वे ठरली आधुनिक भारताची नवी ओळख.
* मोदी सरकारच्या काळात देशभरात विणले गेले नवनवीन महामार्गांचे जाळे
* समृद्धी महामार्ग, अटल सेतू, अवाढव्य पुलांचे, लांबच लांब बोगद्यांचे निर्माण कार्य यशस्वीरीत्या पूर्ण
* जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिजचे निर्माणकार्य
* अवकाश संशोधन क्षेत्रातही भारत सर्वात अग्रेसर, चांद्रयान मोहीम, मंगल यान मोहीम यशस्वी
* स्टार्टअप इंडियाने युवा उद्योजकांना दिली प्रेरणा, भारताला आत्मनिर्भर बनवले.
* भारतीय संस्कृतीचा अभिमान, उज्ज्वल परंपरांचा सन्मान करीत मोदी सरकारने उभारले.
* ६६ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी अनुभवलेला महाकुंभ सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
* अयोध्या नगरीत भव्य श्रीराम मंदिर उभारले.
* काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे निर्माणकार्य पूर्ण झाले.
* उज्जैन येथे महाकाल लोक निर्मिती करून धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना दिली.
* कामाख्या देवी मंदिर विकास कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले.
* श्री केदारनाथ धाम तीर्थक्षेत्राचा विकास करून, लाखो भाविक पर्यटकांचा प्रवास सुखद केला.
* प्रमुख ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.
* हेमकुंड साहिब गुरुद्वारा येथे रोपवेचे निर्माण कार्य यशस्वी झाले.
* बौद्ध धार्मिक स्थळांचा विकास करून, भाविकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या.
आज भारत जगाच्या पाठीवर एक शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्र म्हणून उभा आहे. भारताने जगाला एक कणखर, खंबीर नेतृत्व दिले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यातून घडवूया विकसित भारत, समृद्ध भारत, सामर्थ्यवान भारत ! ११ वर्षांचा सेवा, सुशासन व गरीब कल्याणाचा अमृतकाल साजरा करूया !